पूर्वार्ध !

"who?" :-        अवघा महाराष्ट्र विद्युत सततची उर्जा टंचाई... भार नियमन व दर वाढीने    हैराण आहे... बी पी एल, ए पी एल, असलेले घरगुती ग्राहक, शेतकरी, छोटे, मध्यम उद्योजक, कारखानदार, शल्यशस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स व करून घेणारे पेशंट, अभ्यास करणारी मुले, सायंकाळी शिकवणीला जाणाऱ्या मुली, कांही कामानिमित्त बाहेर फिरणार्या माता भगिनी वृद्ध... इतकेच काय या खात्याचे अधिकारी कर्मचारी देखील विद्युत उर्जा टंचाई... भार नियमन व दर वाढ या बद्दल असलेल्या जनतेच्या रोषामुळे गेल्या दहा पंधरा वर्षापासून हैराण आहेत... कांही लोक मात्र खुश आहेत...  

"what ?"   जरा पोरखेळ पहा... कोणी म्हणत शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ ! ( जाहीरनामा)... कोणी म्हणत टायपिंग ची चूक झाली !(प्रभा राव ) कोणी म्हणत १२/१२/१२ ला भारनियमनाचे वाजवू १२ !( अजीतजी) पण खर कांहीच उतरत नाही... सत्ताधारीच मोर्चे काढतात उपोषण करतात (संजय निरुपम ) पण उभा महाराष्ट्रा या चक्रव्युहात तसाच उभा... दर दोन तीन महिन्यांनी भाव वाढ... अंगवळणी पडल लोकांना अपेक्षा एवढीच कि वीज द्यावि  .... सामाजिक संघटना बोंबा मारतात कोर्टात जातात ... कांहीही होत नाही... अराजक अराजक.. ते दुसरे असते काय?   

"where?" :-  अहो उभ्या महाराष्ट्रात... जर चव चाखायची असेल तर जा कुठल्याही ग्रामीण भागात किंवा शेतकऱ्याच्या बांधावर, पहा आमच्या विद्यार्थ्याचे हाल, मुलींच्या वेदना सर्वत्र कोठेही  .... पण क्या बात है... या बाबत 'समानतेचे घटनेचे तत्व' आमच्या सरकारने मन लावून यशस्वी केलेले दिसेल!
    
"when?"  :-  केंव्हा म्हणजे काय? अगदी कधीहि.... सकाळ संध्याकाळ तीन त्रिकाळ ते सुद्धा सातत्याने १५ वर्षांपासून ! अगदी अविरत!
   
"why?"  :- आता आपण विचारता का ? तेच तर मोठे कोडे आहे... म्हणतात बुवा या मध्ये कांही तरी काळे बेरे आहे... आमच्या घरात व आयुष्यात अंधार करून बहुधा कोणाच्यातरी घरात लक्ख उजेड पडत असेल कदाचित... त्यामुळेच हे चालले आहे...नक्की !
 
"How?"  :-  आता कसे म्हणजे... त्यांना सुचीवलेल्या  व त्यांनीच मान्य केलेल्या उपाय योजना जर यांना लागू करायच्याच  नसतील तर होणार या पेक्षा काय दुसर ते काय ?... कस म्हंटल... तर खरच सांगतो  मुद्दाम... जाणून बुजून... अगदी... जाणीव पूर्वक...!    
  

विश्वास नाही बसायचा... वाटेल काही तरी बोलतोय हा महाराष्ट्र... पण म्हणून जर उत्तरार्धही पहा या इपिसोडचा.....


"who?"  :-  महाराष्ट्रातील एक सामान्य माणूस  भाबडा बिचारा... हे पाहून चिंतन करतो... तळमळीने उपाययोजना सुचिवितो सरकारला २००८  मध्ये... सरकारही त्याला उत्तर देते आपले म्हणणे बरोबर आहे..! या माध्यमातून भार नियमन कमीहि होईल, १०% वीज दर सवलतहि देता येईल... पुढे सरकारला भरघोस उत्पन्नही होईल.. ई... ई...
                महाराष्ट्रातील हा सामान्य माणूस खुश ! आभाळाला गवसणी घातल्याचा आनंद... लोकांचा प्रचंड राग येतो... वाटल सरकार खरच किती चांगल आहे... लोकच मूर्ख आहेत. 
     
"what?"  :-   उर्जा संवर्धनाचे माध्यमातून अतिशय सहज म्हणजे अगदी दीड दमडाहि न खर्चात लोकांना १०% दर सवलत देवून, सरकारला त्या वेळच्या दरानी १५००० कोटी व आताच्या दराने २५००० कोटींचा महसूल मिळून तब्बल २०१२ मे  व्याट वीज मिळणार ! म्हणजे चक्क ११३४० दश लक्ष युनिट्स हो.मग हे  पत्र घेवून महाराष्ट्रातील हा सामान्य माणूस  चप्पलच्या टाचा झिजवत आहे २००९ पासून आज पर्यंत... मंत्रालय, महावितरण... महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग... पुढे उच्च न्यायालय ( औरंगाबाद  खंड पीठ) जन हितार्थ याचिका दाखल पण सरकार उत्तर देत नाही... दर मात्र वाढवीत राहत ...तारीख पे तारीख... एकटा माणूस लढतोय... विषाद येवू नये तर नशीब... कांहीही उपयोग नाही... प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानंतरहि अगदी कायदेशीर दर कसेकाय वाढू शकतात हे आपल्या तर अकलीच्या बाहेर आहे बुवा... पण असेल .... संजय दत्तला नाही का स्वतन्त्र  कायदा! तसे असेल कांही तरी...   ,
     
"where?"   कोठे म्हणजे काय विचारता माझ्या पुरत विचाराल तर अगदी जिव्हारी लागतंय हे सगळ... पदर मोड करून, घासातला घास काढून कांहीतरी समाज क्रुन उतरेल या निखळ भावनेन चालविला हा खटाटोप.... अन हरभरे खाल्ले हात कोरडे अशी अवस्था... बर आमच म्हणन फक्त आमच नाही हो... सरकारन  ते लेखी मान्य केलय... उर्जा संवर्धनाचे माध्यमातून उर्जा बचत करावी असा नियामक आयोगाचा दंडक आहे... सरकारचे धोरण आहे... पण कोणीही ऐकत नाही... न्यालयात सामाजिक प्रश्न प्रथ्म्म्याने ऐकले जातात व शीघ्र निवाडे होतात असेही वाचले ऐकले आहे.. पण तस तर कांही होईना...
              
"when?"   :-  गेल्या तब्बल ५ वर्षापासून हि पिडा सोसत जगत कसला....खर तर मरत आहे... महाराष्ट्र होरपळत आहे... इतर ४/५ राज्यांनी विचारणा केली माझ्याकडे पण माझी क्षमता ती किती... पुन्हा घरच सोडून इतरांच्या फुकट फौजदार्या हे पटतही नाही ना...
                   
"why?"    :-  का म्हणून विचाराल तर मी माझ्या याचिकेत स्पष्टच म्हटल आहे... विजेचा तुटवडा सरकारमधल्या अधिकाऱ्यांना मिटवायचाच नाही... हा तुटवडा राहिला तरच केवळ  चढ्या भावाने वीज खरेदी करून बक्कळ पैसे छापता येतील ना हो मंडळी ... आणि त्यामुळेच आमचे म्हणणे पटत नाही यांना. झोपेच सोंग घेतलय... हव तर वेड पांघरून पेडगावला जातायत म्हणा ना....
                             
"How?"  :-   कसे म्हणाल तर.... पहा आं... सरकार म्हणत महा वितरण कडे जा... महावितरण म्हणत विद्युत नियामक आयोगाकडे जा.. आयोग म्हणणे मांडताना चक्क झोपतो...( माझ्या आईला आय सी यु मध्ये दाखल करून मी हे म्हणणे मांडण्यास गेलो होतो...त्या सुनावणीत इतकी तळमळ... यांनी ऐकलेही नाही खरच झोपले होते सन्माननीय सदस्य पुढे दोन दिवसात व आईही गेली...... प्रश्न आहे तेथेच !

 


             हि झाली स्टोरी... ४/९/८  रोजी प्रस्ताव दिला ८/५/९ रोजी उत्तर मिळाले, महावितरणला गेलो. शरद दाभाडे नावाचे संचालक होते बैठक घेतली मोठ मोठ बोलले... पण केल कांहीच नाही....आयोगाकडे जाण्याचा सल्ला दिला... गेलोही... ते म्हणतात भार नियमन हा आमचा विषयच नाही ! सुनावणी झाली कांहीही नाही... कोर्टात गेलो ४/५ वेळेस चक्क हाकलून दिले अण्णा हजार्यांना भेटल्याची बातमी पेपरात छापून आली कि ताबडतोब याचिका दाखल... नो सुनावणी... तारीख पे तारीख... सरकारला पत्र दिल हे लागू करा याचिका काढतो... केराची टोपली... काय म्हणाव याला.. उलट कसली तरी समिती बसवतात... सबसीडी देऊन दर कमी करतात.. म्हणजे पैसे शेवटी सामान्य माणसाचेच... दारू वही... बोतल नई ! असले लोक वाटोळ करतायत....
कस होईल महाराष्ट्रच... म्हणून तुमच्याकडे धाव..
         यादीतील सर्व विषयावर असेच विवेचन देईन.
सद्य स्थिती, ही याचिका म्हणजे रिट नंबर ३२६० of  २०१० was disposed in २०१४ आपल्या प्रयत्नाने आत्ता २०१७ मधे पुनर्जीवित केली आत्तापर्यंत लाख दोन लाख घातले होते म्हणून आता पैसे नाहीत, अडकले आहेत वकील देवू शकलो नाही म्हणून कोर्टाने डिस्मिस केली! आजही शासनास हजारो कोटींचा महसूली फायदा, कोळशाची बचत, क्लायमेट चेंज वर नियंत्रण आणि विशेष म्हणजे लोकांना १० टक्के दर सवलत देवून वार्षिक ११३४० दश लक्ष units ऊर्जा मोफत मिळू शकते, शेतीसाठी म्हणजे ड्रिपः साठी मोफत देता येईल पण एकटा कमी पडत आहे. 
                
आपला स्नेहांकित,

रवींद्र पाठक

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result