अकोला, दि. 11 – आदर्श कॉलनी येथील थेट  शेतकरी ते ग्राहक या फळ व भाजीपाला विक्री केंद्राला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शनिवारी भेट देऊन हे केंद्र चालविणारे  बार्शिटाकळी तालुक्यातील सिंदखेड (मोरेश्वर) येथील प्रगतीशील शेतकरी मोहन गोपाळराव सोनोने यांचे कौतुक केले. 

श्री. सोनोने यांनी त्यांच्या शेतात उत्पादित केलेले टरबूज व भाजीपाला अत्यंत वाजवी किंमतीत थेट ग्राहकांपर्यंत पोहाचविण्याचा हा उपक्रम अत्यंत स्त्युत्य असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले. ग्राहकांसाठी कमी दरात फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देणाऱ्या अशा विक्री केंद्रासाठी शहरात योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.  

यावेळी उप जिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) अशोक अमानकर हे उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी या केंद्राला भेट देऊन फळांची चव चाखली.  तसेच फळे व भाजीपालाची खरेदी केली

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result