प्रविण तांबोळकर
 शिरूरअनंतपाळ वार्ताहर :

 तालुक्यातील नागेवाडी येथील शंकर बाबुराव कवठाळे
या शेतकऱ्याने आपल्या शेतात टरबूजाची लागवड
करून शंभर दिवसात दोन लाखांचे उत्पन्न
केले आहे. त्यांनी केलेल्या नियोजनामुळे टरबुजाचं त्यांना
मोठं उत्पन्न मिळालं आहे. त्यामुळे परंपरागत शेतीला
फाटा देऊन त्यांनी केलेली टरबूजाची लागवड
त्यांना चांगलीच फायद्याची ठरली आहे.


शंकर कवठाळे यांनी आपल्या पाच हेक्टर क्षेञापैकी साठ गुंठ्यामध्येटरबूज तर पाच एकरमध्ये ऊसाची लावण करुण त्यामध्ये हरभरा पिक घेतले आहे . नोव्हेबर २०१७ च्या शेवटच्या आठवड्या मध्ये केलेल्या टरबुज लागवडीतून आज एकशे दहा दिवसात त्यांना साठ गुंठ्यामध्ये सुमारे दोन लाखाचे
टरबुजाचे उत्पन्न मिळणार आहे . दोन दिवसातच दुसरी
 तोडणी सूरू होणार असून त्यांना टरबूजाला प्रतिकिलो पंधरा रूपये भाव मिळत असुन ते दोन मुलाच्या साह्याने मोठ्या शहरामध्ये जाऊन स्वतः मालाची विक्री करतात ,  त्यामुळे त्याचं उत्पन्न लाखांच्या घरात पोहचलं आहे. शंकर कवठाळे 
यांनी टरबूजाची लागवड पहिल्यांदाच केली आहे.
त्यासाठी त्यांनी अनेक शेतकऱ्यांच मार्गदर्शन घेऊन व
 नियोजनाची पुरेपूर काळजी घेतली. त्यांनी साठ गुंठ्यामध्ये
 टरबुजाच्या शुगरक्रेन जातीची लागवड केली.

 


सुरुवातीला शेताची मशागत करताना नांगरणी करून त्यात
शेणखताचा वापर केला. यानंतर गादी वाफे करून पाच बाय सव्वा फुटावर मल्चींग पेपर आंथरुन  बियांची टोबण लावण केली. सुरुवातीच्या मशागतीनंतर पिक जमिनीवर आल्यावर खत आणि फवारणीच्या नियोजनाला सुद्घा तितकंच
महत्त्व त्यांनी दिलं. त्यांनी सुरुवातीच्या एक महिन्यात केवळ दोनदा फवारणी केली. मात्र मध्यंतरी अवकाळी
पाऊस आणि खराब वातावरणामुळे एका महिन्यानंतर आठ
दिवसातून दोनदा तर फवारणी केली. शिवाय वाॅटर सोल्युबल खत आठदिवसातुन दोनदा ठिबक सिचनाद्वारे सोडण्यात आल . त्यामुळे फळ सशक्त व निरोगी राहण्यास मदत मिळाली .
     अनेक शेतकरी आता परंपरागत पिकांना फाटा देत शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करूण उत्पन्न घेण्याचा प्रर्यत्न करित असले तरी शंकर कवठाळे सारखे खेड्यातील शेतकरी योग्य नियोजन आणि व्यवस्थापण करित लाखोचे उत्पन्न घेत आहेत , त्यांना शेतीच्या कामामध्ये पत्नी सौ महानंदा व मुल सदाशिव व सचीन हे मदत करतात.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result