महेंद्र गायकवाड


नांदेड - कंधार तालुक्यातील मौजे गुंटूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथी वर्गात शिक्षण घेत असलेली कु.अमिता अंबादास नायगावे या विद्यार्थीनीने विभागीय चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून ‘अ’ गटातून तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. 

    कलापुष्प प्रतिष्ठानच्या वतीने विभागीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती.नुकताच या चित्रकला स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.गुरूनाथराव कुरूडे तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय कुरूडे,मल्हारराव वाघमारे,प्रा.डाॅ.मोरे,व्यंकट गव्हाणे,माधव जाधव,बा.पू.गायखर,राजीव अंबेकर,सोपानराव कांबळे,कलापुष्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदाशिव गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
     कार्यक्रमाच्या प्रारंभी मौजे गुंटूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी वर्गात शिक्षण घेत असलेली कु.अमिता अंबादास नायगावे या विद्यार्थीनीने विभागीय चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून ‘अ’ गटातून तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला होता.उपस्थित

मान्यवरांच्या हस्ते कु.अमिता नायगावे हिला शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन पालकांसह गौरविण्यात आले. 
    या यशाबद्दल शिक्षण अधिकार बालाजी कपाळे,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत व्हावहारे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अंबादास नायगावे,सरपंच धुरूबाई  बिजले,केंद्र प्रमुख भांजी,मुख्याध्यापक दिगंबर अंकलगे, सहशिक्षक लक्ष्मण मद्रे,आंनद गायकवाड,देवानंद वलसे,दत्तात्रय पांचाळ,रमेश बिजले,संभाजी यमलवाड,भुजंग चिलपिपरे आदींनी अभिनंदन केले.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result