राजेंद्र निकुंभे 

नंदुरबार - शहादा तालुका एज्युकेशनल अँड को.ऑप एज्युकेशन संचलित आणि एस .एन .डी .टी .महिला विद्यापीठ मुंबई संलग्नित,सिनिअर आर्ट्स महिला महाविद्यालय शहादा येथे सध्या विविध डे सुरू झाले आहेत.
       या डे चे आकर्षण मुलींना खास असते.त्या पूर्ण ६ दिवस विविध डे आहेत.त्यात ९ तारखेला Signature with new dress dat ,१० तारखेला Choli With Chudai Day ,१२  तारखेला Tapori With
 chocolate day,१३ तारखेला Tradition day with fheta day ,१४ तारखेला Group Day १५ तारखेला Saree Day चे आयोजन करण्यात आले आहे.

 


         अनेक मुलींना विचारले असता तुम्ही डे साजरे का करतात तर बहुतांश मुलींचे हेच म्हणणे आहे की,महाविद्यालय जीवनात मज्जा करणे गरजेचे आहे त्याच बरोबर हे दिवस साजरे करण्याने आम्हाला देखील आपली परंपरा टिकवण्याचा आनंद मिळतो,त्याच बरोबर ह्या आमच्या आठवणी कायम टिकणाऱ्या असतील.साडी डे मुळे आम्हाला साडी कशी नेसायची याची देखील माहिती मिळते.तसेच ह्या दिवसात आनंद वेगळा मिळतो.त्याच बरोबर शैक्षणिक वर्षाचे शेवटचे दिवस असतात म्हणून आनंद लुटून घ्यायचा .
        या दिवसांमध्ये मुली विविध पेहेरावात सुंदर,फुलपाखरू सारख्या दिसत होत्या.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result