राजेंद्र निकुंभे

नंदुरबार

                      कविता ही मनोरंजनाचे साधन नसून परिवर्तनाचे माध्यम असावे.कवितांमधून समाजाला आत्मपरीक्षणची सवय लागली पाहिजे.कविता जगविण्यापेक्षा रसिकांनी ती जगली पाहिजे,असे मत"देश आमचा देव नाही,देह आहे,तरी आम्ही बोलू नये," या कार्यक्रमात कवी नितीन चंदनशिवे यांनी व्यक्त केले.
          मित्र मंच शहादा व शहादावासी यांच्या वतीने शहादा येथील विकास हायस्कुलच्या प्रांगणात कवयित्री रमणी प्रस्तृत "देश आमचा देव नाही,देह आहे,तरी आम्ही बोलू नये," या वादळी व मानवतावादी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
        या कवी संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी  शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, लियाखत अली,उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, संजय जाधव,पत्रकार रमाकांत पाटील ,वर्षा जाधव ,संभूदादा पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.  सुरुवातीला आयोजकांच्या वतीने मान्यवर व कवी मंडळींना कवी भूषण गवळे यांचा प्रकाश वाट हा  चारोळी संग्रह व स्मृतिचिन्ह भेट  देऊन स्वागत करण्यात आले.

 


      कार्यक्रमाचे शीर्षका नुसार सर्व कवींनी आपल्या कविता सादर केल्या.काव्यसंमेलन साठी पुण्याच्या कवयित्री रमणी आकाश सोनवणे, सांगलीचे नितीन चंदनशिवे,साताऱ्याचे सागर काकडे, अहमदनगरचे सुमित गुणवंत ,ठाणे येथील दीप पारधे ,पुण्याचे रवींद्र कांबळे, नाशिक येथील भीमराव कोते, औरंगाबाद येथील कृष्णा राठोड यांचे काव्य वाचन झाले.
        रात्रीचा गारवा, व दिव्यांचा दुधी प्रकाशाने सर्व शहादेकर रसिक वर्ग काव्यात तल्लीन झाले. प्रसंग जसा आला तसा कवींना प्रतिसाद देत होते.व्हावा, बहोत खूप, क्या बात है। अशा प्रकारच्या प्रतिक्रीयांनी पूर्ण माहोल झाला होता.
          सुरुवात कवी रवी कांबळे यांनी आपल्या गझल पासून सुरुवात केले.कवी रवी कांबळे यांनी दोन कविता सादर केल्यात या दोन्ही कवितांन मधून रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या कविता ह्या वास्तवतेला भिडणाऱ्या होत्या.
       नंतर कवी  सुमित गुणवंत यांनी आपल्या दोन कविता सादर केल्या त्यांनी "संघर्ष "व "वर्तमानातील स्वातंत्र्य" ह्या वास्तवादी कविता सादर करून कधी करून रसाची तर कधी वीर रसाची निर्मिती केली. 
          सागर कारंडे या कवीने देखील आपल्या दोन कविता सादर केल्या.आणि त्या कविता म्हणजे "तुमच्या एका  गोळीवर",व "देणे घेणे" या होय. "तुमच्या एका  गोळीवर" ही कविता सादर करत असताना रसिक मायबाप अगदी टाचणी पडेल इतकी शांत झाली होती.पुढे काय पुढे काय इतकी उत्सुकता या कवितेने केली.होती, ही कविता कधी संपली हे देखील रसिकांना समजले नाही.इतकं मंत्रमुग्ध करून टाकले होते.
      पुण्याची कवयित्री रमणी हिने आपल्या तीन कविता सादर केल्या तीन्ही कवितांमधून तिने रसिकांचे मन जिंकलेच पण तिच्या कवितेतून स्त्रीवाद वास्तवाद दिसून आला.त्यात तिची पहिलीच कविता म्हणजे "रीत ताट " ह्या कवितेने सगळा रसिक वर्ग परत मंत्रमुग्ध झाला होत.  स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे.तिने सर्व आपल्या सर्वांगावर कपडे घातले असले तरी माणसांच्या नजरा वेगळच काहीतरी शोधत असतात.आणि लहान पासून ते म्हातारी पर्यँत सर्वांवर दररोज अत्याचार,बलात्कार, विनयभंग अशा घटना कशा होतात याची वास्तवादातून स्त्रीवाद मांडला. त्या नंतर बाभूळ ह्या कवितेतून देखील त्यांनी वांझ बाईचे दुःख त्यांनी मांडले, व माणुसकी या कवितेतून देखील त्यांनी मानवाचे दुःख मांडले.
      ज्यांनी  काव्यसंमेलनाची धुरा आपल्या खांद्यावर धरली होती ते कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या कवितेतून विनोद तर घडविलाच पण त्या विनोदातून शिकवण देखील दिली."माझ्या बापाच्या विठ्ठला" ह्या त्यांच्या कवितेतून त्यांनी विठ्ठला आपल्या जागेवरून निघून फिरायला सांगितलं आणि जेव्हा निघून जाणार परत येणार तेव्हा रुखमनला विचारायचं की, एकांत व आकांत काय असतो.तोच एकांत व आकांत माझ्या आईने पाहिला आहे.कारण माझ्या बापाने जेव्हा बाभूळच्या फांदीला दोर बांधून स्वतःला लटकून घेतले.शेतात माझा बाप कसा राबतो,अस्मानी ,सुलतानीच्या संकटाला कशा प्रकारे तोंड देतो या बद्दल विठ्ठलाला माहीत देतो.त्या नंतर त्यांनी "जय हिंद" ही कविता सादर केली या कवितेतून त्यांनी आपण प्रतिज्ञा म्हणतो,पण त्या प्रतिज्ञेसारखे वागत नाही असा आशय मांडतात.शेवटी त्यांनी "कांबळे" ही प्रतिकात्मक कविता विनोद मांडते पण शेवटी समाज व्यवस्थेपुढे कांबळे कसा हतबल होतो.या प्रतिबिंब उमटविले.
       कवी कृष्णा राठोड यांनी आपल्या दोन कविता सादर केल्या त्यात पहिली कविता म्हणजे "तांडवाच्या मातीत  पेरायच मला "  या कविते मधून त्यांनी बंजारा समाजाचे खरे दुःख मांडले, त्यांना आपल्याला समाजाला मिळणाऱ्या शासनाच्या विविध सवलती,कोण कोणत्या आहेत त्या मिळाल्या नाहीत व त्या सवलती दुसरेच कशा प्रकारे खाऊन गेलेत याची माहिती काव्यातून मांडली, त्यांची दुसरी कविता म्हणजे " मातीच दुःख "  या कवितेतून त्यांनी शेतऱ्याचे दुःख मांडले.
      कवी दीपक पारधे यांनी "चौकातला देव व एवढीच खंत ह्या दोन कविता सादर केल्यात त्यांनी वास्तवतेला हात लावून सध्याच्या परिस्थितीचे वर्णन केले .
     भीमराव कोते यांनी  "वर्गातल्या मुली कुठं गेल्या " व संस्कृती या दोन कविता सादर करून रसिकजनाचे मनोरंजन करून स्त्रियांवर कशा प्रकारे अत्याचार व त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बद्दल आशय मांडला.
        कवी आकाश सोनवणे यांनी " माझे अनंत हात" व "माझा बाप" या कविता सादर केल्या त्यांच्या कवितेतून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनांने दलित समाज व इतर समाज बहुजन समाज कशा प्रकारे सुधारला त्यांच्या आत्म जाणीव कशी झाली हा आशय घेऊन आपल्या कविता सादर केल्या.
       कार्यक्रमाचे आयोजन         चंद्रकांत शिवदे, विष्णू जोंधळे, ऍड .सुशील पंडीत, भरत अग्रवाल, कल्पेश पटेल, निलेश शिवदे ,तसेच शहादा तालुका पत्रकार संघ, शहादा तालुका मराठी पत्रकार संस्था आदींच्या वतीने करण्यात आले.
        या काव्यसंमेलनास शहादा शहर,परिसर व तळोदा येथील रसिक मंडळी आली होते.जसजश्या कविता सादर होत होत्या तसतसा मैफिलीत रंग चढत होता.काव्यसंमेलन संपले तरी रसिक खिळून होते.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result