श्रीक्षेञ  माहूर / कार्तिक बेहेरे

           माळी समाज युवा मंचचे मराठवाडा उपाध्यक्ष सुरेश गी-हे यांच्या निवास स्थानी क्रांती ज्योती सावित्रीबाईं फुले यांच्या स्मृति दिना निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून विविध  समाज संघटनेच्या वतीने  अभिवादन करण्यात आले.

         महिला शिक्षणाची   जननी क्रांती ज्योती सावित्रीबाईं फुले यांच्या स्मृति पित्यर्थ आज दि.10 मार्च रोजी सुरेश गी-हे यांच्या निवासस्थानी सेनेचे शहर प्रमुख नीरधारी जाधव,युवा सेनेचे तालुका प्रमुख विकास कपाटे,आशीष चारभाई,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे,बुद्ध युवक संघटनेचे  प्रितेश वानखेडे,गणेश पूरी,धीरज बेहरे,माळी युवा मंचचे तालुकाध्यक्ष पवन गवळी,अखिल भारतीय माळी महासंघ तालुकाध्यक्ष कार्तिक बेहेरे आदि मान्यवरांनी सावित्रीबाईं फुले यांच्या   प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून त्यांना  आदरांजली वाहिली.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result