किशोर सोनकांबळे
लातूर जिल्हा प्रतिनिधी :

लातूर :- जी जन्मदाती आई झाली नाही,परंतु उघड्यावर पडलेल्या,घराच्या आत कोंढलेल्या, अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या तमाम देशाची आई , विद्येची देवता, जिच्या कष्टाचे मोल कशातच मोजता येनार नाही, ज्या स्री ला घराचा उंबरठा ओलांडने देखिल बंदी होती, गावचाच काय घराच्या  कारभाराची सुत्रे देखिल हाती नसायची ही स्थिती बदलुन त्या स्री ला घराबाहेर काढुन स्वाभिमान देणारी, आज जी आमची माता बहीन समाजात स्वाभिमानाने जगतेय ना ते केवळ जिच्या कष्टाची फळ आहेत.अगदी ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासुन ते राष्ट्रपती पदावर बसविले, स्री शिक्षण केले खुले,अनंत अडचणींवर मात करून,स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका, ज्ञान ज्योती , क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त महात्मा फुले ब्रिगेड च्या वतीने राधाबाई रसाळ, जानकाबाई हाके , जयश्रीबाई शेंडगे या सावित्रीआई च्या लेकींच्या शुभहस्ते क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळा परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क,  मेन रोड लातूर येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय किसनराव चांबारगे (माळी) व लातूर जिल्हा संपर्कप्रमुख सुनिल वांजरवाडे उपस्थित होते.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result