महाव्हाँईस ब्युरो
मुंबई-: ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन.या दिनाचे औचित्य साधून स्त्री-शक्तीचा सन्मान करण्यासाठी  मीरा रोड येथील "वैभव योगा" क्लासेसच्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे योग फॅशन शो ठेवण्यात आले.या शो मध्ये वय वर्ष ८ ते ८० वर्षापर्यंत ५० विद्यार्थिनी ,महिलांनी स्टेजवर सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात प्रत्येक महिलांचा सन्मान करून आठशे महिला उपस्थितीने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
"वैभव योग वर्ग " हे मीरा रोड येथे गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे चालू आहे.येथे योग-ध्यान प्राणायम असे विविध प्रकार शिकविले जातात.त्याच प्रमाणे निसर्ग उपचार देखील दिले जातात.
या कार्यक्रमाला मीरा भाईंदरच्या मेजर श्रीमती डिंपल मेहता आणि मीरा भाईंदर म्युनिसिपल रुग्णालयाचे डॉ.मकरंद फुलझेले उपस्थित होते.
हे कार्यक्रम नीता सोनावणे,प्रसन्न सोनावणे,भारती जिरे,योगिता दिवेकर ,सारिका राऊत,श्रावणी भोईर,योगिनी,स्मिता सावंत तसेच सर्व आयोजकांनी चांगल्या रीतीने पार पाडले.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result