दि.१६ मार्च  लातूर येथील शिवाजी चौकात दगडफेक करुन  शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणार्‍य़ा  आठजणांना गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेवून न्यायालया  समोर हजार केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्य़ात आली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, १६ मार्च रोजी सायंकाळी लातूर शहरातील शिवाजी चौकात अचानक दगड फेक करून शहरात तणावाचे वातावरण तयार करण्यात आले होते.या मुळे अवघ्या काही क्षणात तणाव निर्माण झाला होता याचा तपास करून ८ जणांना ताब्यात घेतले असून आणखी १९ जण फरार आहेत. 

       त्यांचा शोध घेत असून विविध भागात  पोलिस पथक रवाना झाले आहेत.   अटक करण्य़ात आलेल्यांध्ये नितीन मोहनाळे, करण आल्टे, कृष्णा खानापुरे, प्रशांत डोईजोडे, शैलेश तिवारी, अभय तिवारी, आकाश सुरवसे आणि आकाश गायकवाड यांचा समावेश आहे.एकूण  २७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे असून त्या पैकी ८ जनना   ताब्यात घेण्यात आले असून आणखी काही जण फरार आहेत.
फरार आरोपीचा शोध गांधी चौक पोलिस करत आहेत.

 

Comment


अँट्राँसिटी कायदा असावा का ?


Result