रत्नाकर जाधव
बिलोली 
बिलोली तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व त्यांचा खाजगी चालक यांना २८,०००/लाच स्वीकारतांना लाचलूचपतक विभागाने सापळा रचून पकडले. त्यांच्यावर रीतसर गुन्हा रामतीर्थ पोलीस ठाण्यात नोंदवून बिलोली येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तालुक्यातील प्रस्थापित संस्थाचालक असलेल्या विश्वास लक्षमन रचुरे यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी कुंडलवाडी येथील संस्थेच्या शिक्षकाला मारहाण प्रकरणी त्यांच्या विरुद्ध कुंडलवाडी ठाण्यात गुन्हा दाखल आहे.तर त्यांच्या बिलोली,कुंडलवाडी व बिजूर येथील संस्थेच्या शिक्षकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कडे तक्रार दिली आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, लोकशिक्षण प्रसारक मंडळ बिजूर संचालित संस्थे मार्फत तालुक्यातील बिलोली,कुंडलवाडी व बिजूर येथे शैक्षणिक संस्था आहेत.बिजूर येथील एक कर्मचारी प्राथमिक शिक्षक म्हणून घेतले व शिक्षणाधिकरी यांच्या कडून प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणीम्हणून मान्यता आणली  व त्यामुळे संस्था चालकाने  शिक्षकाचे वेतन तेवढे देऊन उर्वरित ७,०००/ प्रमाणे ३ महिन्याचे असे २८०००/ रुपये लाच मागितली.शिक्षकाच्या अश्या तक्रारीवरून नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून संस्थेचे संस्था चालक विश्वास लक्ष्मण रचुरे व त्यांच्या खाजगी वाहन चालक शहाजी विश्वमभर मोरे यांना रु.२८,०००/ ची लाच घेताना रंगेहाथ पकडले व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर सापळा लाचलूचपतक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या व उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.एल.पेडगांवकर ,पोलीस नायक बाबू गाजुलवार,एकनाथ गंगातीर्थ,जगनाथ आनंतवार, अंकुश गाडेकर यांनी शिक्षण संस्था चालक व खाजगी चालक यांच्या विरुद्ध बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना बिलोलीचे न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरील प्रकरणातील संस्था चालकाच्या मनमानी कारभारामुळे व संस्था चालुका कडून होत असलेल्या आर्थिक मागणी सातत्याने केली.या संदर्भात कुंडलवाडीचे पोलीस ठाण्यात दोन महियापूर्वी गुन्हा नोंदविला होता.तर या संस्थे अंतर्गत शिक्षकांनी त्यांच्या विरुद्ध संस्थाचालकाडून होणाऱ्या आर्थिक पिळवणूक व मारहाण प्रकरणाची तक्रार राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result