कोल्हापूर : भरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील युवती ठार झाली तर तिचा मित्र किरकोळ जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना आज दुपारी शिरोली येथील ग्रामीण रुग्णालयासमोर घडली सारिका वसंत कांबळे (वय 23 राहणार लाइन बाजार कसबा बावडा) असे मयत युवतीचे नाव असून ती आज दुपारी मित्र अक्षय शशिकांत बुकडे(वय25 रा.सैनिक दरबार, क. बावडा रोड) याच्या सोबत मोटरसायकलीवरून कागल येथील मैत्रिणीकडे जात होती. त्या दरम्यान हा अपघात झाला. सारिकाची बहिण प्रमिला आवडे ही पोलीस शिपाई असून सारिका एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होती. अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे झाली आहे

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result