.वाशिम दि.१३:(अजय ढवळे जि.प्र.)स्थानिक लोक वस्ती असलेल्या रविवार बाजारातील अनधिकृत ३ ते ४ कुंटनखाण्यावर कर्तव्य दक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका मिना यांच्या विशेष पथकाने नुकताच छापा मारला.या छाप्या मध्ये १३ पिडित महिला व मुली आढळुन आल्या असून त्यांची सुटका करण्यात आली,हे कुंटनखाने चालविणाऱ्या तीन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.वाशिम शहरातील मुख्य  व्यापार पेठ असलेल्या रविवार बाजारात ३ते ४  कुंटनखाने सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर  उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका मीना यांच्या पथकातील पोलीस अधिकारी अस्मिता मनोहर ,नम्रता राठोड,विशाल हिवरकर,राजेंद्र वानखेडे,मनोज काकडे,विलास पवार,हनुमान घुगे,रोहित ठाकरे,प्रदीप बोडखे,श्याम घायाळ,वंदना इंगोले,प्रियंका लाटे, यांचा समावेश असलेल्या पथकाने चार ते पाच कुंटनखान्यावर छापा टाकला.या छाप्यामध्ये १३ पीडित महिला व तरुणी असता,त्यांना पैशाचे आमिष दाखवून देहविक्रीचा जबरदस्तीने व्यवसाय करून घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक विजय पाटकर यांच्या तक्रारीवरून वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये कुंटनखाना चविणार्या   ताराबाई बाजड,माला तायडे,सीमा वाघमारे यांच्या विरुद्ध स्त्रिया व मुली अनैतीक देह व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,५,प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका मीना यांनी वाशिम येथे प्रथमच एवढी मोठी कारवाई केल्या मुळे जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.या घटनेचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता मनोहर या करीत आहेत,दरम्यान लाखाळा परिसर,सुंदर वाटिका, जुनी आय यु डी पि पंचशील नगर, या भागात हायप्रोफाईल कुंटनखाने सूरु असून यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result