किशोर सोनकांबळे
लातूर जिल्हा प्रतिनिधी : 

निलंगा येथील सर्वसामान्य जनतेचा वाली कुणीच राहिला नाही ज्यांच्यावर विश्वास होता तेच आता खुनी बनल्याने नेमका विश्वास कोणावर ठेवावा हा प्रश्न जनते समोर पडला आहे.

या बाबत माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील चीचोंडी येथील वयो वृध्द पांडुरंग श्रीपती मार्तंड हे ७ मार्च रोजी  त्यांची मुलगी लिंबाळा येथे असल्याने मुलीला  भेटण्यासाठी गेले होते. मुलीला भेटून परत चीचोंडी ला निघाले होते.दुपारी १ वा. बस असल्याने बसची वाट पाहत निलंगा येथील बसस्थानकात बसले होते . त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा राम हा ही सोबत होता पण मुलांना खायला घेवून येतो म्हणून ते बाहेर गेले .पण तितक्यात बस स्थानक येथील बीट अमालादर कोळी हे त्या वयोवृद्ध व्यक्ती जवळ गेले ते आजारी असल्याने झोपले होते .ते पाहून कोळी यांनी काहीही न बोलता हातातील काठीने मारहाण सुरू केली काही समजण्या अगोदरच मार खात असतानाच पांडुरंग जग्यावराच कोसळले .त्या नंतर कोळी तेथून निघून गेले.पण तो वयोवृद्ध व्यक्ती जाग्यावरच पाडून असल्याचे पाहून काही नागरिकांनी ही घटना बीट अमलादर यांना सांगितली त्यांनी लगेच येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.त्या नंतर येथील डॉक्टरांनी त्याला लातूर येथे घेवून जाण्यास सांगितले.त्यांनी लगेच स्वतः  १०८ का फोन करून त्याला लातूर येथील शासकीय दवाखान्यात पोहचवून  तेथून पसार झाले.त्यामुळे रक्षकच भक्षक बनल्याने परिसरात विविध चर्चेला उधाण आले असून संबंधित पोलिस यांच्या वर गुन्हा दाखल झाल्या शिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा.पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result