राजू थोरात /सांगली


माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या शनिवारी दहा मार्चला सोनसळ आणि  वांगी ता. कडेगाव येथे झालेल्या अंत्यसंस्कारावेळी गर्दीचा फायदा घेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही  चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घालत अत्यंसंस्कासाठी आलेल्या अनेकांचे सोन्याच्या दागिण्यासह रोख रक्कम आणि मोबाईल हातोहात लंपास केले.
डॉ.कदम यांच्या अंत्यसंस्कारावेळी सोनसळ आणि  वांगी येथे लोकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरटयांनी अनेकांचे खिसे रिकामे केले. यात चोन्यांच्या चेन, ब्रेसलेट, मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली.
याबाबत चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात अनेकांनी फिर्यादी दिल्या आहेत. यात सांगलीतील उद्योsजक मयुर पाटील यांची सोनसळ येथे  चोरटयांनी दहा तोळयांची चेन आणि पॅन्टच्या खिशातील 15 ग्रॅमचे पेन्डल आणि साडेदहा हजार रूपये लंपास करण्यात आले. तसेच लालासे राजाराम पाटील रा.शेणोली ता. कराड यांची पाच तोळयांची चेन अरूण विठ्ठल सावंत रा.सावंतपूर वसाहत यांचे 20 हजार रूपये, सुखदेव बापू थोरात रा.शेरे ता.कराड यांची दोन तोळयाची चेन, दिनकर जगन्नाथ माळी कडेगाव यांची तीन तोळयाची चेन, लिलावती मारूती सपकाळ रा.सोनसळ यांची दीड तोळयाची बोरमाळ, वसंतराव रामचंद्र देसाई रा. कानोली ता.आजरा यांचे 25 हजार रूपये, राजेंद्र जालिंदर पाटील रा.शेरे ता. कराड यांचे दोन तोळयाची चेन, चिंतामणी किसनराव पवार रा.चिंचणी ता.कडेगाव यांची एक तोळ तीन ग्रॅमची चेन, दिनेश अमृतलाल पारेख रा.सांगली यांचे 17हजार रूपये, शांताबाई रघुनाथ पवार रा. पाडळी ता. कडेगाव यांची सव्वा तोळयाची बोरमाळ, चरण सहदवे कोल्हे कडेगाव यांचे 1800 रूपये, पृथ्वीराज राजेंद्र पवार रा.शिवणी ता. कडेगाव यांची 12 ग्रॅमची चेन, संतोष बापुराव पाटील रा.गुलमोहोर कॉलनी सांगली यांचे दहा हजार रूपये व 18हजाराचा  मोबाईल, बाळासाहेब वसंत वत्रे रा. वांगी याचे 15 ग्रॅम वजनाची चेन अशा दहा ते बाराजणांना चोरटयांनी दणका दिला.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result