राजू थोरात / प्रतिनिधी 


सांगली/ आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात अंदाजे बावीस ते पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचा अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी रोजी सकाळी उघडकीस आली. अज्ञाताच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, बिरोबा देवालयाच्या जवळच नाना साहुबा कोळेकर ( रा. आरेवाडी ) यांचे भांडी ठेवण्याचे पत्र्याचे खोके आहे या खोक्यासमोर मोकळे पत्र्याचे शेड आहे. या शेडमध्येच रक्ताच्या थारोळ्यात एक महिला पडली असल्याचे येथील बिरोबा ट्रस्टचे जगन्नाथ कोळेकर यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले . घटनास्थळाची पाहणी केली असता डोक्यात दगड घालून महिलेचा खून केला असल्याचे उघडकीस आले . दरम्यानच्या काळात पोलिसांनी चौकशी केली असता येथेच हॉटेल व्यवसाय करणारे धुळा कोळेकर हे रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास नाना साहुबा कोळेकर यांच्या पत्र्याच्या शेडजवळ आले असता त्यावेळी तेथे ( एम. एच .०९ - १२४२ या नंबरची पॅशन दुचाकी , एक महिला , एक पुरूष ,व तीन ते चार वर्षाची मुलगी तीथे होती याचवेळी महिला व पुरूष यांच्यात भांडणे सुरू झाली होती असे पांडुरंग कोळेकर यांनी सांगीतले.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result